Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि 2019 मधील पहाटेचा शपथविधी या दोन्ही मुद्द्यांवर मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या विधानाची राजकीय चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते ते फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. शिंदे गटातील 25 पेक्षा जास्त आमदारांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. तेही फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत. त्यांनी जरा याविषयायवरही बोलावं. भुतकाळात काय घडलं आणि काय नाही यावर चर्चा करावी, असं आव्हान राऊत यांनी दिलं.
Pankaja Munde : ‘तुमचं प्रेम हेच आशीर्वाद पण, पैसे पाठवू नका’; पंकजांची भावनिक साद
महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे त्यावर बोला. तुमचा एक भंपक माणूस तुम्ही राजभनवनात आणून बसवला. त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व करत होतात. राजभवनाचा राजकीय अड्डा आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय?, असा सवाल राऊत यांनी केला.
या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहतील आणि जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, फडणवीस शिंदेंना या सरकारच्या काळात पूर्ण काळ मुख्यमंत्री ठेऊन अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार आहेत. असं असेल तर मग फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालत बसणार आहेत का?, असा खोचक सवाल राऊत यांनी केला.
Nanded Hospitals death: आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच; वडेट्टीवारांचा आरोप
फडणवीस यांनी सांगितले की भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागतात. या तडजोडी मूळ शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आहेत. मग महाराष्ट्र चोर दरोड्यांच्या हाती गेला तरी चालेल. महाराष्ट्राची इज्जत धुळीला मिळाली तरी चालेल. राज्यात अनागोंदी अराजक निर्माण झाले तरी चालेल. फडणवीस हे स्वतःच स्वतःचा अपमान करत आहेत. ज्या पद्धतीने तुमचे मातेरे आणि पोतेरे दिल्लीने केल आहे त्याची आम्हाला लाज वाटते. तुमची दया येते अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.