प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी
Sanjay Raut On NCP Shiv Sena Split : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख (Assembly Election 2024) आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. अशातच प्रचार सभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहेत. यावेळी संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला लक्ष केलाय. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे कोणाचा हात होता? राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यामागे कोणाचा हात होता? हे गौतम अदाणी (Gautam Adani) आणि अजित पवार यांना विचारा, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अदाणी यांनी पक्ष (NCP Shiv Sena Split) फोडला हे अजित पवारांना विचारा. अजित पवार कबुल करत आहेत की, महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणीनं पाडलं आणि शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे देखील नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांची हातमिळवणी आहे.
निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध; संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारांशी संवाद
संजय राऊत पुन्हा बॅग तपासणीच्या मुद्द्यावर आक्रमक होत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांची बॅग तपासून दाखवा. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणे एक दिखावा आहे. ठाकरेंसारखे नेते बॅगेतून पैसे नेणार का? असा सवाल राऊतांनी माध्यमांसमोर केलाय. निवडणूक आयोग मोदी शहा यांच्या दबावाखाली काम करतंय. निवडणूक आयोगाची कारवाई एकतर्फी आहे. पैशाचे वाटप सर्रास सूरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’
शरद पवार यांची शेवटची निवडणूक असं अजित पवार यांनी विधान केलंय. यावर संजय राऊत म्हणाले की, शरद पवार की अदानी, कोणी पक्ष फोडले हे अजित पवार यांना विचारा. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडण्यामागे अदाणी यांचा हात होता, हे अजित पवार यांनी कबूल केलंय.अजित पवारांच्या म्हणण्यानुसार आमचं सरकार उद्योगपतींनी पाडलं. अदानी, फडणवीस आणि शहा यांच्यात वारंवार बैठका व्हायच्या, असं देखील संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.