Sanjay Raut on Amit Shah: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या (Gyanesh Kumar) राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचे (India Alliance) आंदोलन सुरु आहे. तसेच कॉक्रोच जनता पार्टीही (CJP) या आंदोलनात सहभागी आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाष्य केले, 14 पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करुन, दिड किलोमीटरच्या परिसरात फक्त 8 हजार लोकांची गर्दी जमवून, तुम्ही देशाचा आवाज बनू शकत नाहीत, असे अमित शहा म्हणाले. अमित शहांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली.
IITian Baba Death : आयआयटीयन बाबांचे निधन, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह?
देशात आणि राजधानी दिल्लीत आंदोलनं सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन बाळगलं होतं. आता ते समोर येऊन मोर्चात केवळ 8 हजार लोक सहभागी झाल्याचं सांगत आहेत. त्यांची नजर कमजोर झाली आहे, अशी बोचरी संजय राऊत यांनी केली.
देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असून, त्याविरोधात दिल्लीसह विविध राज्यांत आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनांमधून व्यक्त होणाऱ्या जनतेच्या आक्रोशाकडे अमित शाह यांनी इतके दिवस दुर्लक्ष केलं. मात्र, आता त्यांनी मोर्चातील सहभागी लोकांची संख्या केवळ 8 हजार असल्याचं म्हटलं आहे, असं राऊत म्हणाले.
‘आरोग्य मंत्रालयाने अमित शाहांच्या तपासणीसाठी समिती नेमावी’
अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, “लाखोंचा मोर्चा त्यांना केवळ 8 हजारांचा दिसत आहे. त्यांची नजर कमजोर झाली आहे. ते मानसिक दडपणाखाली आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने समिती स्थापन केली पाहिजे.”
“किती खोटं बोलतो हा माणूस? अमित शाह यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत,” अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.
‘8 हजार लोकांसाठी अडीच लाख पोलिसांचा बंदोबस्त का?’
मोर्चातील लोकांच्या संख्येवरूनही संजय राऊत यांनी अमित शाह यांना सवाल केला. “मोर्चात फक्त 8 हजार लोक असतील, तर तुम्ही घाबरता कशाला? त्या 8 हजार लोकांसाठी अडीच लाख पोलिसांचा बंदोबस्त का केला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महायुतीची मैत्रिपूर्ण लढत ठरली; पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला
‘निवडणूक घोटाळ्यात मदत करणाऱ्यांना संरक्षण’
निवडणूक प्रक्रियेवरूनही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. निवडणूक आयुक्तांना संरक्षण दिलं जात नसून, भाजपच्या कथित निवडणूक घोटाळ्यात मदत करणाऱ्या माफियांना संरक्षण दिलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
