Maharashtra Political Crisis : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शिंदे गटानं (Shinde group) नेमलेला प्रतोद बेकायदेशीर ठरला आहे. प्रभू हेच कायदेशीर व्हीप असल्याचे न्यायालयाने (Court) यावेळी सांगितले आहे, तर त्या व्हीपनुसार हे आमदार बेकायदेशीर ठरले आहेत. फक्त तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचाय. ते बेकायदेशीर व्हीपच्या आदेशांचं पालन करू शकत नाहीत, यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ज्याचा महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर मोठा परिणाम होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बेकायदेशीर असून ते संविधानाच्या विरोधात आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.