Sanjay Raut : “नेता असाच असतो मोकळा ढाकळा” अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत राणेंना टोला

खासदार संजय राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकौंटवरून ते नेहमी नवनवीन ट्विट करत विरोधी पक्षांना लक्ष करत असतात. असंच एक ट्विट त्यांनी आज केलं आहे. संजय राऊत यांनी आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये नारायण […]

Untitled Design (90)

Sanjay Raut

खासदार संजय राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकौंटवरून ते नेहमी नवनवीन ट्विट करत विरोधी पक्षांना लक्ष करत असतात. असंच एक ट्विट त्यांनी आज केलं आहे. संजय राऊत यांनी आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओ मध्ये अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये नारायण राणेंवर मिश्किल भाषेत टिप्पणी केलेली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांना “दादा म्हणजे कमाल का चीज” असा उल्लेखही केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ट्वीटमध्ये अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत, त्याला त्यांनी कॅप्शन लिहलं आहे. कॅप्शन मध्ये  “नेता असाच असतो असंही राऊत म्हणाले आहेत. “दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांच हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्याला रिप्लाय देत आहेत. त्यामध्ये अजित पवार यांच्याच इतर ठिकाणच्या भाषणातील क्लिप राऊत यांना उत्तर म्हणून येत आहेत.

https://twitter.com/thetipsymonk/status/1629021070593495040

 

Exit mobile version