Sanjay Raut letter to Modi for Shrikant Shinde Foundation : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election ) पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्यांच्या फाउंडेशनच्या ( Shrikant Shinde Foundation ) संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे राऊत यांनी केले आहे.
भाविकांसाठी आनंदाची बातमी! Amarnath Yatra ची नोंदणी सुरू; यंदा 52 दिवस चालणार यात्रा
संजय राऊत यांनी मोदी यांना लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे.त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार
चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे.
त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे!
सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत.
धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत.पैसै देणारेकोण आहेत?
@PMOIndia
@Dev_Fadnavis pic.twitter.com/LFD2dAfAn9— Sanjay Raut (@rautsanjay61) April 15, 2024
श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील करण्यात येतो. मात्र हा निधी कुठून येतो असा संवाद संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर मोदींना लिहिलेल्या पत्रात राऊत म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार काळा पैशांची व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या दहा वर्षांपासून अथक परिश्रम करत आहात.
2024 या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याची व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली पांढरा करण्यात येत असलेला धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे. असं म्हणत राऊत यांनी मोदींकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.