Download App

Bhima Patas : राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार?; मोदी अन् ED ला टॅग करत राऊतांची CBI कडे तक्रार

Sanjay Raut Filed Complaint Against Bhima Patas Cooperative Sugar Mill : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून संजय राऊत गेल्या काही दिवसापासून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आपण आता थेट दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली आहे. असंही या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे. या कारखान्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना हा भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे. तर संजय राऊतांचा आरोप आहे की, या कारखान्यात मनी लॉन्ड्रींग झाले आहे. कारखान्याचा पैसा खाजगी कामासाठी परदेशात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी या अगोदरही संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने आपण आता थेट दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली आहे.

Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता

यानंतर संजय राऊत या कारखान्याबाहेर जाहिर सभा घेणार आहेत. मात्र अद्याप या सभेला परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण सभा होईलच अशी माहिती संजय राऊतांनी दिली. त्यामुळे आता या कारखान्याबाहेर मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. कारण राहुल कुल यांचे समर्थक देखील तेथे आक्रमक होऊ शकतात.

या अगोदर देखील खा. राऊत यांनी कुल यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढली काढली होती. प्रतिमा जाळल्या होत्या.

Tags

follow us