Sanjay Raut On BJP : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान राज्यातील 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.
या दरम्यान तिकडे मणिपूर मध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढता हिंसाचार पाहता प्रशासनाकडून हिंसाचारग्रस्त भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 1700 घरं पेटवून देण्यात आली आहे. यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी शिबिरांमध्ये आश्रय घेतलाय.
Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता
यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले. कर्नाटक निवडणुका कलाटणी देणाऱ्या निवडणूका ठरणार आहेत. भाजपकडे एकमेव कर्नाटक राज्य होतं. ते आता राहणार नाही. भाजपने बजरंग बली ला निवडणुकांमध्ये उतरवलं , हनुमान चालीसा इत्यादी त्यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बली त्यांच्या डोक्यात गदा मारणार आहे पहा तुम्ही. 13 तारखेला बघा तुम्ही.
तसेच राऊतांनी मोदींवर देखील हल्ला केला. ते म्हणाले, मणिपूरला आग लागली आहे. मणिपूर पेटलं आहे आणि तुम्ही पंतप्रधान म्हणून कर्नाटक मध्ये प्रचार करत आहेत. तर शिवसैनिक म्हणून घेणारे बेळगाव सीमा भागात महाराष्ट्र्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी महाराष्ट्र्र एकीकरण समितीचा पराभवासाठी पैसे पाठवले. आम्ही त्यांच्या बुद्धीचा निषेध करतो.