‘मोदी डबडं वाजवत फिरतात की आम्ही महासत्ता आहोत’; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल!

Sanjay Raut on BJP: शिवसेना पक्षफूट प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

Sanjay Raut on BJP, Supreme Court Hearing, Shiv Sena Split Case, Devendra Fadnavis

Sanjay Raut on BJP, Supreme Court Hearing, Shiv Sena Split Case, Devendra Fadnavis

Sanjay Raut on BJP, Supreme Court Hearing, Shiv Sena Split Case, Devendra Fadnavis: मुंबई : शिवसेना पक्षफूट प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी न्यायालयात जे सांगितले, तेच सत्य आहे. शिवसेनेला (Shiv Sena) सुरुंग लावण्याचे काम भाजपने आधीच ठरवले होते. आता या कटकारस्थानाची सर्व पाने उलगडणार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निकाल अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय

सुनावणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. आणखी एक दिवस सुनावणी होईल आणि त्यानंतर प्रकरण क्लोज फॉर ऑर्डर होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निकाल अपेक्षित आहे.”

कामाची बातमी! बाथरूमचा दरवाजा सतत बंद ठेवणं धोकादायक; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

पुढे ते म्हणाले, “हा संपूर्ण प्रकार लोकशाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणून पाहिला जाईल. आमदार आणि खासदार फोडून सरकार स्थापन करण्यात आले. निवडणूक आयोगाचे पाठबळही मिळत गेले. अशा पद्धतीने कोणतेही सरकार स्थिर राहू शकत नाही.”

“शाह आणि कंपनी निवडणूक आयोग, न्यायालय आणि पैशांच्या बळावर सरकार स्थापन करू शकतात, विजय विकत घेऊ शकतात, तर ते लोकशाहीच्या व्याख्येला कलंक लावणारे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिला, तर भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणीही धजावणार नाही. आम्ही न्यायमंदिरात याचिका दाखल केली आहे,” असेही राऊत म्हणाले.

‘मोदी डबडं वाजवत फिरतात की आम्ही महासत्ता आहोत’

राहुल गांधी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “पुतिन, ट्रम्प आणि जिनपिंग हे तीन महासत्तांचे नेते आहेत. मोदी मात्र डबडं वाजवत फिरतात की आम्ही महासत्ता आहोत. भारत खरोखरच महासत्ता असता, तर या यादीत चौथे नाव मोदी आणि भारताचे असते.”

लोणावळ्यातील 4 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई; ऑर्किड, रिदम, फर्न आणि बेसिलिकाचे परवाने निलंबित

“आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलावे लागते, कारण राष्ट्रीय व्यासपीठावर बोलण्यावर बंदी आहे. आम्हाला तुरुंगात टाकले जाते. आमचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचावा, यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर करावा लागतो,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखलाही दिला. “सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यासाठी जर्मनीत जाऊन हिटलर यांना भेटले होते. ते सिंगापूरलाही गेले होते. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलावे लागणे, हे मोदी आणि शहा यांचे अपयश आहे. कारण या देशात लोकशाही नाही. सावरकरही परदेशातील व्यासपीठावर गेले होते, ” असे राऊत म्हणाले.

‘दुष्काळासाठी केंद्राकडून दमडाही मिळणार नाही’

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरूनही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून दमडाही मिळणार नाही. गुजरात किंवा उत्तर प्रदेशमध्ये दुष्काळ पडला असता, तर केंद्र सरकारने तातडीने मदत केली असती,” असा आरोप त्यांनी केला.

‘प्यार का पंचनामा 2’मध्ये अभिनयाची संधी हुकली, पण शर्वरीला मिळालं मोठं काम; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उलगडला प्रवास!

तसेच, एसआरएच्या माध्यमातून 50 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “तुमच्या दरबारातील बिल्डरांकडून हा महसूल वसूल करा. एसआरएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना या 50 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची माहिती असली पाहिजे. एक हजार कोटी रुपयेही चार हप्त्यांमध्ये मिळणार आहेत. एसआरएचे अध्यक्ष म्हणून फडणवीस यांना मी लिहिलेले पत्र आणि गगराणी यांचे पत्र मिळाले आहे,” असे राऊत म्हणाले.

सुनील राऊत यांच्यावरील आरोपांवर काय म्हणाले?

सुनील राऊत यांच्यावर बिल्डरांना लाभ मिळवून दिल्याचे आरोप होत असल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, “मी आयुष्यात काम केले आहे, धंदा केलेला नाही. मी कोणत्याही बिल्डरला भेटत नाही. मराठी माणसाने व्यवसाय केला, तर काही लोकांच्या पोटात दुखते.”

“कंबोज आणि लोढा यांच्या नावांसोबत भोसले आणि पाटील यांची नावे आली, तर काही लोकांच्या पोटात दुखते. मराठी बिल्डरांचे प्रकल्प अडवले जात आहेत. सुनील राऊत यांना नोटीस पाठवणार आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

‘नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करा’

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करा. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रस्ताव आणावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ,” असे ते म्हणाले.

इंदू मिल स्मारकाच्या कामावर प्रश्न उपस्थित

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडल्याबाबतही त्यांनी भाष्य केले. “या समितीवरील लोकांनी आणि प्रकाश आंबेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्मारकाच्या कामाची किंमत का वाढली? इतर प्रकल्पांच्या टेंडरची किंमत वाढते, तसेच स्मारकाचे मूल्यांकनही वाढले का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

तुकाराम मुंढेंच्या FDA चा राज्यभरात कारवाईचा धडाका! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “हे सरकारच एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. सरकारच मिस्टेकने आले आहे, आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू.” उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत की, तुम्ही तुमच्या सूचना मांडा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न द्या’

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना संजय राऊत यांनी सावरकरांच्या नातवांच्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला. “सावरकरांच्या नातवांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे की, सावरकरांनी माफीनामा दिला होता. मग आता त्यांना हद्दपार करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, “सरकारने सावरकरांना भारतरत्न द्यावा. मोदी सरकारला सत्तेत येऊन 12 वर्षे झाली, मग अद्याप भारतरत्न का दिला नाही? एऱ्यागैऱ्यांना भारतरत्न दिले जाते, मात्र बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप भारतरत्न दिलेला नाही.” असे संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version