अजितदादा अन् फडणवीस शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार; राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut : मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले […]

Letsupp Image   2023 07 22T124735.572

Letsupp Image 2023 07 22T124735.572

Sanjay Raut : मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!

मणिपूरची स्थिती कश्मिरपेक्षा भयंकर आहे. ज्या महिलांची धिंड काढण्यात आली त्यातील एका महिलेचा पती देशासाठी लढला आहे, आणि देशाचं संरक्षण करत असताना आपल्या पत्नीची अब्रु तो वाचवू शकला नाही. देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट, मणिपूरची हिंसा, महिलेवरील अत्याचार पाहात बसले आहे. पंतप्रधानांनी तिकडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा पण तो पण घेत नाही. मन की बात नही मणिपूर की बात करो. सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं तेव्हा तुम्ही यावर बोलले आहात. संसदेत याप्रकरणी बोलू दिलं जात नाही.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील. ही जी दोस्ती आहे ते दोघे मिळून शिंदे गटाचा कार्यक्रम करतील. हे सगळं ठरल्याप्रमाणे स्क्रिप्टनं होईल, असे राऊत म्हणाले. तसेच अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भावी मुख्यमंत्री अजित पवार असे ट्विट केले. यावर देखील राऊतांना भाष्य केले. मी आधीच सांगितलं होतं, अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहे, असे राऊत म्हणाले.

Exit mobile version