Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा होता. भाजपला गरज होती, आता ती पूर्ण झाली आहे. आता ते फेकले गेले आहेत. आता शिंदे कधीच या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. हे लोक शिंदे यांचा पक्षही फोडू शकतात, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय.
मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही! फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं
संजय राऊत म्हणाले की, ज्यांच्यासोबत काम करतात त्यांचा पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती नेहमीच राहिली आहे. आजपासून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होणार आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत असूनही त्यांना 15 दिवस सरकार स्थापन करता आलेले नाही. म्हणजे पक्षांतर्गत किंवा महायुतीत काहीतरी गडबड आहे. उद्यापासून ही अडचण आपल्याला दिसेल. ते महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हितासाठी काम करत नाहीत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.
अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड; सलग सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे दीड आठवडा मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस होता. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला स्वत:चा मुख्यमंत्री हवा होता. अखेर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. मात्र, शिवसेनेला एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे होते. शिंदे सरकारच्या धोरणांमुळेच महायुतीला निवडणुकीत अशी कामगिरी करता आली, असा शिवसेनेचा युक्तिवाद होता. आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. मात्र ते अजून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
#WATCH | Delhi: Ahead of the swearing-in ceremony of Maharashtra CM-designate Devendra Fadnavis today, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, “Shinde era is over, it was just for two years. His usage is now over and he has been tossed aside. Shinde will never be the CM of this… pic.twitter.com/4kyySN4uEZ
— ANI (@ANI) December 5, 2024
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गृहमंत्रालयासह उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, असं सांगण्यात येतंय. मात्र गृहमंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे एकनाथ शिंदे संतापले आणि त्यांनी गृहखाते न दिल्यास सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. फडणवीस यांनीही त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागणीबाबत हायकमांडशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रात महायुतीला 232 जागा मिळाल्या आहेत. भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत, शिवसेनेने (शिंदे गट) 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. युतीच्या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडीची महाविकास आघाडी चांगलीच मागे पडली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 आणि काँग्रेसला 16 जागा जिंकता आल्या.