Sanjay Raut On Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिलला सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दरम्यान सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शिंदे गटावर टोलेबाजी केली आहे.
काय आहे संजय राऊतांचं ट्विट?
काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ,
आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ…
जय महाराष्ट्र! – संजय राऊत, खासदार
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
जय महाराष्ट्र!
😄😄 https://t.co/PQqCmfWpj8— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
दरम्यान सत्तासंघर्षांच्या निकालावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, जे लोकं म्हणतात निकाल आमच्याच बाजून लागणार आहे त्यांनी काहीतरी गडबड केलीय. देशात विधानसभा, संसद, न्यायालय संविधानानूसार काम करतात की नाही हे कळणार आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र की कोणाच्या दबावाखाली काम करते, याचाही फैसला उद्या होणार असून जे लोकं आमच्या बाजूने निकाल लागणार असल्याचं म्हणातहेत त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
Maharashtra political Crisis : …असा निकाल येऊ शकतो, अजित पवारांनी व्यक्त केली शक्यता
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे, असं आम्ही म्हणत नाही पण आम्हाला उद्या न्याय मिळणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा निकाल लागणार आहे. सरकार येईल, जाईल पण सर्वोच्च न्यायालयात भविष्याचा निकाल होणार आहे.