sanjay raut on sharad pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पुस्तकांत पवारांनी नेमके काय लिहिलं, याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. पवारांनी या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरांमुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणताही विचार दिल्लीतील नेत्यांच्या मनात नसल्याचं पवारांनी लिहिलं. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावर आपली प्रतिक्रिया दिली.
पवारांनी या पुस्तकात लिहिलं की, मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालया हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इछ्तितो, असं पवारांनी पान 417 वर लिहिलं आहे. त्यामुळं ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आरोप उध्दव ठाकरे आणि संजय राऊत करत असतात. नुकत्याच झालेल्या वज्रमुठ सभेतही उध्दव ठाकेरंनी मुंबईला तोडण्याचा डाव असल्याची भूमिका मांडली होती.
‘त्या’ शासन निर्णयांची होळी करणार, समित्यांना श्रद्धांजली वाहणार; वंचित सुरू करणार आंदोलन
दरम्यान, पवारांच्या या मजकुरावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊतांनी पवारांच्या एकदम विरोधी भूमिका घेतली आहे. नाही, मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागू शकत नाही. कारण, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव होताच. आणि आजही आहे. मग 105 हुतात्मांनी आपलं बलिदान का दिलं? असा सवाल राऊतांनी केला. मुंबईसाठीच हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. याचा विसर कुणालाही पडू नये, अस सांगत राऊत म्हणाले की, मुंबईवर सातत्याने हल्ले होतात. हे हल्ले मुंबईला आर्थिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या तोडण्याचे कमवकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचं राऊतांनी सांगितलं.
मुंबईतील उद्योग पळवून नेणं, प्रकल्प नेणं, मुंबईवरती सातत्याने आर्थिक अतिक्रमणं करण, याचा अर्थ काय? असा सवालही राऊतांनी केला आहे. दरम्यान, राऊतांच्या या प्रतिक्रियेला शरद पवारांकडून काय उत्तर येतं, हेचं पाहणं महत्वाचं आहे.