Sanjay Raut On Shinde Fadnavis sarkar : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Integration Committee)उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बेळगावला गेले आहेत. बेळगाव न्यायालय (Belgaum Court) आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रचाराच्या वेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या विरोधात तरी या ठिकाणी येऊन प्रचार करु नये, असा सल्ला दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पैसा पुरवला जात असल्याचा खळबजनक आरोप राऊतांनी केला आहे.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊन किमान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करु नये असा गेल्या 60 वर्षांचा अलिखित नियम आहे. येतील आता काही दिवसांनी महाराष्ट्रातील भाजपचे लोकं येतील, कॉंग्रेस पक्षाचे लोकं येतील, त्या मिंधे गटाचे लोकं येतील त्यांना उभं करु नका, तिथं महाराष्ट्राचं नाव घेता आणि इथं महाराष्ट्राचं नाव बदनाम करता, उभं करु नका त्यांना असं आवाहनही यावेळी संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केलं आहे. यावेळी त्यांनी बेळगावमध्ये प्रचार रॅली काढली.
यावेळी ते म्हणाले की, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना या पद्धतीने त्रास देण्याचे प्रयत्न सुरुच असतात. मी समिती उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी आलो आहे. जामीन मिळाला नसता तर मला अटक झाली असती इतकंच. बेळगाव येथील माझा आजचा दौरा न्यायालयातून होतोय हा शुभ शकुन आहे. सर्वांनी एकत्र संघटित रहावे अशी माझी अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले.
बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई, महाराष्ट्रातून भाजपच्या फौजा पाठवल्या आहेत, तिथे ते ठाण मांडून बसले आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटासह भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.