Download App

‘CM शिंदेंची इतिहासात लाचार अन् गुडघे टेकणारे मुख्यमंत्री म्हणून नोंद होणार’

  • Written By: Last Updated:

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची ऑफर आल्याचं म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लाचार आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल. (Sanjay Raut Press)

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह

पक्षांतरासाठी आमच्यासह अनेकांवर दबाब आले. दिल्लीतूनही अनेक फोन आले. मात्र, असे असतानाही आम्ही आमची निष्ठा विकली नाही. शिवसेनेला विकणे म्हणजे स्वतःच्या आईला विकण्यासारखे असून, बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणी करून एकप्रकारे स्वतःची आई विकल्या सारखेच आहे. याचा पश्चाताप 2024 साली यांनी होईल.

2024 च्या निवडणुकीत भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव होणार

पुढे बोलताना राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव होणार असल्याचा विश्वासही राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच सध्या मुंबई गिळंकृत करण्याचा डाव सुरू आहे. यासाठी पहिले उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं आणि त्यासाठी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली. आत्ताच्या केंद्र सरकारला मुंबईवरील ताब्यासाठी हे सर्व सुरू आहे.

Yevgeny Prigozhin : वॅग्नर चीफ प्रिगोझिन जिवंत? खुद्द रशियातूनच केला जातो आहे दावा

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि असली तरी त्यावर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये यासाठी किमान दहा वर्षांपासून मोदी सरकार प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली, मुंबईतील व्यवसाय आंतरराष्ट्रीय कार्यालय हे गुजरातमध्ये खेचून नेले, मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्याचेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचा विकास होऊ नये यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाहीयेत. मुंबईची सर्व सूत्र हे ठरल्याप्रमाणे मोदी सरकारने उद्योगपती धनिकांच्या सरकारने दिल्लीकडे घेतली आणि आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. जर, आज शिवसेना सत्तेत असती तर, हे कदापी होऊ दिलं नसतं आणि त्यासाठीच शिवसेना फोडण्यात आली.

“अजितदादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की लगेच…”; जय पवारही राजकीय एन्ट्रीसाठी सज्ज

…तर शिंदेंनी राजीनामा द्यावा

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्र्यांना अत्यंत लाचार गुलामी पद्धतीने सत्तेवर बसवले असून, वरिष्ठांना जे हवयं ते त्यांच्याकडून करून घेतलं जातयं. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून स्वाभिमान थोडा तरी शिल्लक असेल तर राजीनामा देऊन सरकारला जाब विचारा असा सल्ला राऊतांनी यावेळी शिंदेंना दिला.

एकनाथ शिंदे हे लाचार आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल. त्यांनी मुंबईचा घास हा मोदी शहांच्या महाराष्ट्र द्रोही सरकारला घेऊ दिला आणि हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होते. देशातील महिला सुरक्षित नाहीत सरकारचं लक्ष कुठे आहे? असा सवाल करत महिलांच्या आणि देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी 27 पक्षांचे रक्षाबंधन गटबंधन समोर आल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us