Yevgeny Prigozhin : वॅग्नर चीफ प्रिगोझिन जिवंत? खुद्द रशियातूनच केला जातो आहे दावा

Yevgeny Prigozhin : वॅग्नर चीफ प्रिगोझिन जिवंत? खुद्द रशियातूनच केला जातो आहे दावा

Yevgeny Prigozhin: वॅग्नर ग्रुपचे (Wagner Group) प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचे निधन झाले आहे. खुद्द रशियाने (Russia) याला दुजोरा दिला आहे. प्रीगोझिन यांना मंगळवारी रशियातील सेंट पीटर्सबर्ग (Saint Petersburg) शहरात दफन करण्यात आले. मात्र, सर्व पुरावे मिळूनही प्रिगोझिन जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असे दावे खुद्द रशियातूनच केले जात आहेत. या दाव्यांचे मुख्य कारण म्हणजे प्रिगोझिनचा जुना इतिहास.

डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियन राजकीय विश्लेषकाने दावा केला आहे की प्रिगोझिन अद्याप मेला नाही. 23 ऑगस्ट रोजी विमान अपघातात प्रिगोझिनचा मृत्यू झाला नाही तर त्याचा डुप्लीकेटचा झाला आहे. राजकीय विश्लेषकाने असा दावाही केला की वॅग्नर चीफ एका अज्ञात देशात जिवंत आहे आणि तो मुक्तपणे फिरत आहे. डॉक्टर व्हॅलेरी सोलोवी असे हा दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते रशियाचे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आहेत.

प्रिगोझिन डुप्लीकेट वापरत होता
डॉ. व्हॅलेरी सोलोव्ही हे मॉस्को येथील प्रतिष्ठित संस्था ‘इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन’ (MGIMO) येथे ते माजी प्राध्यापक होते. रशियन हेरांना एमजीआयएमओमध्येच प्रशिक्षण दिले जाते. याच कारणामुळे डॉ. सोलोवी यांनी वॅग्नर चीफ जिवंत असल्याचा दावा केला तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. त्यांनी असा दावा केला की मृत्यूला चकमा दिल्यानंतर, प्रीगोझिन आता बदला घेण्याची तयारी करत आहे.

Asia Cup 2023: बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम

डॉ. सोलोवी यांनी आरोप केला आहे की, रशियन अधिकारी प्रिगोझिनच्या डीएनएचे खोटे दावे करत आहेत. वॅग्नर चीफला मारण्याची योजना अयशस्वी झाली, कारण प्रिगोझिन नव्हे तर डुप्लीकेट प्रिगोझिन विमानात बसला होता. प्रिगोझिनचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोत तो दाढी करताना दिसत आहे. आफ्रिका आणि मध्यपूर्वेमध्ये राहून तो आपली ओळख लपवत आहे, असा दावा केला जातोय.

प्रिगोझिनच्या मृत्यूवर डॉ. सोलोवी काय म्हणाले?
डॉ. सोलोवी म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे प्रिगोझिन ज्या विमानाने प्रवास करणार होते ते विमान रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले. उडत्या विमानात स्फोट झाला नाही. बाहेरून शूट करण्यात आले होते. वॅग्नर चीफला ठार मारण्याचे गुप्त ऑपरेशन रशियन सुरक्षा परिषदेने तयार केले होते, असा त्यांचा दावा आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यास मान्यता दिली.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं

रशियन राजकीय विश्लेषकाचा दावा आहे की प्रिगोझिन जिवंत आहे आणि मुक्त फिरत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनाही माहित आहे की वॅग्नर चीफ विमानात प्रवास करत नव्हते. डॉ. सोलोवी म्हणतात की स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी प्रीगोझिनला त्याच्या उर्वरित लोकांना मारण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्याने ही ऑफर घेतली, पण आता तो बदला घेण्याची तयारी करत आहे. हे करण्यासाठी त्यांच्याकडे खूप पैसा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube