Sanjay Raut : मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा ठाकरे गटाने (UBT) दिला. मात्र, ही नीती केवळ मुंबईपुरती (Mumbai) असणार की संपूर्ण राज्यभर वापरली जाणार याबाबत पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)भाष्य केलं.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता (Mumbai) आहे. स्वबळाचा नारा दिला म्हणजे मविआ संपली, असा नाही.
शिवसेनेत धुसफूस सुरु, पुण्याच्या बैठकीतून मोठ्या नेत्याचा काढता पाय
पुण्यात आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महापालिका तसंच जिल्हा परिषदेच्या निडवणुका होणार असल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीकडं लक्ष देणं गरजेचं आहे, यासह अनेक विषयावर चर्चा झाली. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, तर काहींनी महाविकास आघाडीसोबत लढलं पाहिजे, प्रत्येकाच्या काही भूमिका आहे. पण मुळात प्रत्येक बूथवर मजबुतीने काम करणं गरजं आहे. त्यामुळं आम्ही महानगर पालिका ताकतीने लढवू, असंही राऊत म्हणाले.
रवी राणांची जेपी नड्डांच्या जागी नेमणूक झालीये का?, संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई महानगरपालिका ठाकरे गट स्वबळावर लढणार याविषयी विचारलं असता राऊत म्हणाले, महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता आहे. कारण मुंबईची परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत. स्वबळाचा नारा दिला गेलाय, याचा अर्थ असा महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरता आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईवर अनेक वर्षांपासून सेनेचा पगडा आहे. शिवसेनेनं इथं सातत्याने आपली पकड ठेवली. आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे, असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. तेच शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडलं.
आता इतर शहरात किंवा जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, हे त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भूमिका विचारात घेऊन आम्ही निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडी ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार झाली होती. तर ‘इंडिया’ आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. आता याचा वापर स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने करायचा, हे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील, असंही राऊत म्हणाले.