Download App

Sanjay Raut : शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं; संजय राऊत असं का म्हणाले?

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप घडवून आणला होता. आपल्या ४० समर्थक आमदारांसह त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आलं होत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणून विरोधक डिवचतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह ४० आमदारांवर कायम टीकेची झोड उठवतात. मात्र, आता राऊत यांनी मोठं विधान केलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही, असं ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=U-DO31oT2ys

मुंबईकच्या मुलाखतीत बोलतांना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेसोबत गेलेले ४० आमदार हे भाजपात टिकणार नाहीत.. शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे सफेद झूठ आहे. शिवसेनेला भाजपने फोडलं आहे. हा पक्ष अमित शाहांनी फोडला. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडून सूड घेतला आहे. त्यांनी आपल्या सत्तेतचा दुरूपयोग केला आहे, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचं नाव घेतल्यावर थुंकल्याच्या कृतीचं वाईट वाटलं? 

एकनाथ शिंदे यांच्यात काहीच ताकत नव्हती. यांच्यावर केंद्रीय तपास यंणांचा धाक निर्माण करण्यात आला. एकनाथ शिंदे हे फार फार तर सात-आठ आमदारांना आपल्यासोबत नेऊ शकत होते. कारण, त्यांची क्षमता तेवढीच होती. बाकी आमदार हे केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग, इलेक्शन कमिशन, न्यायववस्था त्यांच्या टाचेखाली असल्याने गेले. लोकशाहीत असं होऊ नये, असं राऊत यांनी सांगितलं.

भाजपने पक्ष फोडला, पण यात उद्धव ठाकरेंची काहीच चुक नाही, ते लोकांना व्यवस्तित बांधून ठेवतात, असं म्हणायचं का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, आम्ही राहिलो ना सगले, त्यांच्याबरोबर. जे लोक ठाकरे यांच्यासोबत आहेत, ते पक्षाचेच लोक आहेत. बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेले लोक आहोत आम्ही, असं राऊत म्हणाले.

Tags

follow us