Download App

Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात

संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.

  • Written By: Last Updated:

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रवार केलाय. ते म्हणाले, महायुती सरकारने आणलेली योजना लाडक्या बहि‍णींसाठी नसून विधानसभेत मतं विकत घेण्यासाठी आहे. (Ladki Bahin Yojana )  तसंच, अजित पवार बारामतीतून पराभूत होतील. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे सरकारची शिंदेशाही; विरोधात काम केल्यास लाडकी बहिणमधून नाव डिलिट, आमदाराची धमकी

हे पैसे तुमच्या खिशातील नाहीत

महायुतीने लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणली नाही. ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठीच आणण्यात आली आहे. पण लाडक्या बहिणी लाचार नसून त्या आगामी विधानसभेत तुमचा पराभव करतील, असंही राऊत म्हणाले आहेत. तसंच, फुटीर आमदारांना 50 कोटी आणि खासदारांना 100 कोटी दिले. पण लाडक्या बहिणीच्या खात्यावर फक्त 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. महायुतीला पाठिंबा देणाराच आमदार महिलांच्या खात्यातून पुन्हा पैसे परत घेण्याची भाषा करतो. हे पैसे तुमच्या खिशातील नसून सर्वसामान्यांनी भरलेल्या करातील आहे असा दाखलाही राऊतांनी दिलाय.

अजित पवार पराभऊत होतील

ज्यांनी महिलांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेण्याची भाषा केली. त्यांची मानसिकता तपासावी लागेल. आधी त्यांची पत्नी पराभूत झाली आता पतीचा पराभूत होण्याचा नंबर आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी नाव न घेता आमदार रवी राणा यांच्यावर केली. आमचं सरकार सत्तेत आलं तर 1500 रुपयांत वाढ करू, असं आश्वासनही संजय राऊत यांनी दिलं. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. 14 महापालिकेवर सध्या प्रशासक असून सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, विधानसभेला त्यांना

संताप निर्माण झालाय

लोकसभेच्या सर्वे अनुकूल नव्हता महाराष्ट्राचा सर्वे देखील अनुकूल नाही. पण तरीही राज्यात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही राऊतांनी ठामपणे सांगितलं. तसंच, आशात सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आणि सत्ताधारी पक्षात असलेले मंत्री-आमदार सर्वसामान्य महिलांना योजनेतून वगळू म्हणून धमक्या देत आहेत. त्यामुळे राज्यातील महिला वर्गामध्ये संताप निर्माण झाला आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

follow us