ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एक मोठा स्फोट केला होता. त्यानंतर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांनी कालच्या मुलाखतीमध्ये एक धक्कादायक स्फोट केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही सरकार बनवत असताना उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असे फडणवीस म्हणाले आहेत. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे. पुर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे देवेंद्र फडणवीस यामध्ये खुप फरक आहे, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती. देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत, किती दिवस राहतील हे सांगता येत नाही. ही दिल्लीची मर्जी आहे, असेही राऊत म्हणाले.
(आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल)
दरम्यान कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांनी पोलिस पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर देखील राऊतांनी भाष्य केले आहे. पोलीस पोलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात, हे पुराव्यासह उघड झालं आहे. कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर आरोप करत असतील म्हणजे त्यांच्याकडे पक्की माहिती असेल, असे राऊतांनी सांगितले.
तसेच सरकारच्या मनात निवडणुकीला सामोरं जायचं भय आहे. सरकार पाडण्यात निर्लज्जपणा आणि बेडरपणा दाखवतात. तो बेडरपणा निवडणुका घ्यायला दाखवा, अशी टीका राऊतांनी सरकारवर केली आहे. आम्ही 2024 ची तयारी आम्ही सुरु केली आहे, असेही राऊत म्हणाले.