आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या
सरसेनापती संतांची घोरपडे साखर कारखान्याद्वारे सामान्य शेतकरी आणि सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी सभासदांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे या तक्रारीमध्ये म्हणले आहे. दाखल तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

40 कोटींचा घोटाळा?
आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये स्वत: जाहीर कार्यक्रम घेवून कारखान्याकरीता शेअर्स भागभांडवल गोळा केले आहे. मुश्रीफ यांनी दहा हजार रुपयांप्रमाणे हजारो शेतकऱ्यांकडून शेअर भांडवल घेतले. तसेच मुश्रीफ यांनी त्यांच्या राजकीय पदाचा व वर्चस्वाचा गैरफायदा घेत गोरगरीब लोकांना व शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Raj Thackeray : नामांतरावर राज ठाकरे म्हणाले… ‘…हेच खरं हिंदवी सुराज्य !’

मुश्रीफांच्या घरी ED च्या धाडी…
काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी ईडीने धाड (ED Raid) टाकली होती. कागलमधल्या घरी ईडीचे अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली होती. यानंतर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली होती.

ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…तर बापट घरी कसे बसतील

मुश्रीफ समर्थक झाले आक्रमक
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षडयंत्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची कोणतीही चौकशी व शहानिशा न करता दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही समर्थकांनी पत्रकात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube