ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…तर बापट घरी कसे बसतील

ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…तर बापट घरी कसे बसतील

मुंबई : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) मतदार संघातील पोट निवडणुक भाजप व महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली. यातच प्रकृती अस्वस्थ असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना देखील भाजपने प्रचारात उतरवले. ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घेऊन गिरीश बापट प्रचारासाठी हजर झाले. मात्र यावरून विरोधकांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. यावर फडणवीस म्हणाले, बापटांच्या मतदारसंघात निवडणूक होत असतील तर ते घरी कसे बसतील असे म्हणतच ते स्वतःच पक्षासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याचे सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट हे गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कार्यात सक्रिय नव्हते. तब्येत ठीक नसल्याने ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नव्हते. पण अखेरीस कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. बापट यांची प्रकृती अस्वस्थ असताना देखील भाजपने त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.

यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक टीका केली होती. यावर एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले की, तुम्ही गिरीश बापट यांना ओळखतच नाही. बापट हे भारतीय जनता पार्टीचे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भाजपला तळागाळापासून वरपर्यंत घेऊन आले आहे. त्यांनी स्वतःचे जीवन पक्षासाठी दिले आहे. त्यांच्या मतदार संघात निवडणूक होत असताना बापट घरी कसे बसतील असे फडणवीस म्हणाले.

नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही बापटांना प्रचारासाठी या असे म्हंटलो नाही. मी जेव्हा बापटनां भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता. बापट म्हणाले, मी तुमच्या विरोधात आहे अशी माहिती विरोधक पसरवत आहे. हे मला अजिबात सहन होणार नाही. मी याबाबत एक सभा घेतो. मात्र यावर फडणवीस म्हणाले तुम्ही सभा न घेता एक पत्रक जारी करा व विरोधकांना उत्तर द्या.

Accident : मध्यप्रदेशात बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्य तर…

मात्र बापटांनी स्वतः सभा घेत विरोधकांना उत्तर दिले. आम्ही बापटांना प्रचारात उतरवणार नव्हतो मात्र याला विरोधकच जबाबदार आहे. विरोधकांच्या अफवांमुळे तसेच गिरीश बापट यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले होते. यामुळेच स्वतः गिरीश बापट हे निवडणुकीच्या प्रचार रिंगणात उतरले असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube