Sharad Pawar retirement: पवारांच्या निवृत्तीनंतर संजय राऊतांचे ट्विट

Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी ट्विट केले आहे. एक वेळ […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T133933.014

Sanjay Raut t

Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी ट्विट केले आहे.

एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=eqgjt2FOYcs

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले. मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे,” असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच “मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

Exit mobile version