Download App

Sanjay Raut जेलमध्ये जाणं पत्करतील पण… राऊतांच्या भावाने ठणकावले

मुंबई : ‘संजय राऊत जे बोलले ते सभागृहाच्या बाहेर बोलले त्यामुळे त्यांच्यावर कायद्याने हक्कभंगाची कारवाई करण्यात येऊ शकत नाही. पण या देशात लोकशाही राहिलीय कुठे ? त्यामुळे कोणावरही कोणतीही कारवाई होऊ शकते. संजय राऊतांविरोधात आणलेला हक्कभंगाचा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे.

त्याचबरोबर संजय राऊत हे विधानभवनाला चोर नाही म्हणाले. ज्या 40 आमदारांनी गद्दारी केली त्यांना ते चोर म्हणाले. कारण ज्या लोकांनी पक्ष, पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं त्यांना जर राऊत चोर म्हटले असतील. तर मीच नाही देशातील सर्व जनता त्यांचं समर्थन करेल असं ही यावेळी संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत हे म्हणाले आहेत.

Sanjay Raut : हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय? संजय राऊत यांना काय शिक्षा होऊ शकते?

त्याचबरोबर संजय राऊत कारवाईला घाबरत नाहीत करण ज्या ईडीने, भाजपने त्यांना चुकीच्या कारणास्तव साडे 3 महिने जेलमध्ये टाकलं. त्यावेळी सुद्ध ते घाबरले नाही. त्यांनी तुरूंगात जाणं पत्कारलं. पण गुढघे टेकले नाही. तर यावेळी बाजू मांडू न दिल्याबद्दल सुनिल राऊत म्हणाले की, भाजपकडून आम्हाला ते बाजू मांडू देण्याची आपेक्षाच नाही. असं ही यावेळी संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत हे म्हणाले आहेत.

Tags

follow us