Download App

सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या संबंधात समन्वय साधण्यासाठी सरकारकडून सत्ताधारी मंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई हे आहेत. मात्र सीमाभागातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या दोन मंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सीमा भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. हे दोन मंत्री कोणत्या बिळात लपले आहे? तसेच ते हरवले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद हा सुरु आहे. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून कर्नाटक सरकार व राज्यातील सरकार यांच्यामध्ये चर्चा देखील होणार होती मात्र ही चर्चा झाली नाही. तसेच सत्ताधाऱ्यांमधील दोन मंत्री हे सोमा भाग दौऱ्यावर जाणार होते, मात्र परिस्थिती जैसे थी आहे. यामुळे आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे. तसेच हे मंत्री हरवले आहे अशा आशयाची पोस्ट देखील आपल्या अकाउंटवरून ट्विट केली आहे.

नेमकं काय लिहिलं आहे ट्विटमध्ये
चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई अशा दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात याची नोंद राहील. Shame!Shame!!
मराठी माणसांचे गद्दार.दुसरे काय?

अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी या आशयासोबतच एक फोटो देखील ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी सुरुवातील हरवले आहेत…Missing … सीमाभागात मराठी जनता संयुक्त महाराष्ट्रासाठी एकाकी लढत असताना त्यांना साथ द्यायचं सोडून हे कोणत्या बिळात लपून बसले आहेत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक, अशा शब्दात संजय राऊत यांनी पाटील व देसाई यांच्यावर टीका केली आहे.

Tags

follow us