संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे फक्त स्टंटबाजी, राणेंचा हल्लाबोल

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल जीवानीशी संपवण्याची धमकी मिळाली. राऊतांना मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली. कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खा. राऊतांना धमकी मिळाल्यामुळे कायदा […]

Untitled Design   2023 04 01T202257.731

Untitled Design 2023 04 01T202257.731

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल जीवानीशी संपवण्याची धमकी मिळाली. राऊतांना मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली. कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खा. राऊतांना धमकी मिळाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याची टीका विरोधककांकडून होते आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी देखील राऊतांना मिळालेल्या धमकी प्रकरणी आपली प्रतिक्रिया देतांना राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

राणे हे आंबा महोत्सावाच्या उद्घाटना आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळई राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करतांना सांगितलं की, संजय राऊत यांचे आरोप म्हणजे, नुसती स्टंटबाजी आहे. राऊत यांचा कुठला उद्योग आहे की, त्यांना सतत धमकी मिळते? संजय राऊत हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि माध्यमांच्या झोतात राहण्यासाठी असली वक्तव्य करत आहेत. फक्त प्रोटेक्शन मिळाव यासाठी ते असे खोटेनाटे आरोप करत असल्याचं राणेंनी सांगितलं.

यावेळी बोलतांना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली होती. राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे. 2 गटात झालेल्या दंगलीला धार्मिक स्वरूप आहे की काय, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलतांना राणेंनी सांगितलं की, चिंता करायची गरज नाही. तुमचं सरकार असतांना लोकांना चिंता होती. उद्धव ठाकरे हे केवळ राज्याचे नव्हे, तर फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, असा चिमटा त्यांनी काढला.

आहाना कुमराचा बोल्ड आणि मादक अंदाज

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जाळपोळ झाली होती. भाजपने आणि विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दंगल घडवून आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपावर भाष्य करतांना राणेंनी सांगितलं की, एक सांगतो की, देशात आणि राज्यात आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपला दंगे करण्याची गरज नाही, असं राणे म्हणाले.

छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे यांना काळाराम मंदिरात वेदोक्त पध्दतीनं मंत्र म्हणण्यास मनाई करण्यात आली. त्यावरून राज्यात मोठं रणकंदन सुरू आहे. याबाबत राणेंना प्रश्न विचारलं असतं, मी धार्मिक विषयावर भाष्य करणार नाही, असं सांगत त्यांनी हात झटकले.

Exit mobile version