संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट, ‘ते महायुतीत आल्यास रेड कार्पेटवर स्वागत करू…’

Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या […]

SANJAY SHIRSAT

SANJAY SHIRSAT

Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसा (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Sujay Vikhe : विरोधकांना फार महत्त्व देऊ नका, सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

सकाळी अकरा वाजता संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीविषयी बोलतांना शिरसाट म्हणाले, राज ठाकरे आणि आमचे जुने संबंध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा मराठवाड्यात सभा घेत असत, तेव्हा राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत. तसंच आमचं आहे. खूप दिवसांपासून राज ठाकरेंशी बोलायचं होतं. एरवी भेटल्यावर थोड्याबहुत राजकीय विषयावर चर्चा होतात. पण आता पुढं काय करायचं, यांनी काय करायचं, अशी विषयांवर आज चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले.

मानेंना तिकीट, खोतांचा गेम! तरीही फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला सदाभाऊ तयार 

महायुतीकडून काही निरोप घेऊन आला आहात का, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, मी महायुतीकडून कोणताही निरोप घेऊन आलेलो नाही. असे संदेश वरिष्ठ पातळीवर दिले जातात. माझ्या सारख्याच्या माध्यमातून असा कुठला मेसेज दिला जाईल, अशी कल्पानाही मी करू शकत नाही.

राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत सामील होणार की, नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागत होईल. साहेब तुम्ही महायुतीत आलं पाहिजे, तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असू, असं आम्ही आधीपासूनच सांगत आलोय. उघडपणे बोलत आलोय, ते महायुतीत आले तर ताकदीचा वेगळा परिणाम जाणवेल आणि सीट निवडून येतील, असं शिरसाट म्हणाले.

ते म्हणाले, सध्या राज ठाकरे यांचे लक्ष त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याकडे आहे. युतीविषयी नंतर ते बोलतील.माझं वैयक्तिक मत आहे की, राज ठाकरेंनी महायुतीत यावं, असा मनोदय शिरसाट यांनी बोलून दाखवला.

Exit mobile version