Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती खूप खराब, 15 ऑगस्टनंतर बळजबरीने अॅडमिट करणार; शिरसाटांची माहिती

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat on CM Eknath Shinde : दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांनी सर्व प्रशासकीय बैठका, दौरे रद्द करून दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर आम्ही त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करू, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. (Sanjay Shirsat on On Chief Minister Eknath Shinde health After August 15 they will be forcibly admitted)

शिरसाट यांनी आज माध्यमांना बोलतांना सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चोवीस तास काम करणार नेते आहेत. हे अवघ्या जनतेला ठाऊक आहे. आमच्या सारख्या अनेक आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. आम्ही त्यांना 15 ऑगस्टनंतर बळजबरीने… हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. आम्ही त्यांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल करणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे की, त्याची तुम्हाल कल्पना नसेल. आम्ही जवळ राहतो, आम्हाला माहिती आहे, असं शिरसाट म्हणाले.

Ashish Shelar : युती कुणामुळे तुटली?, खडसेंना फैलावर घेत शेलारांचा ठाकरेंना करेक्ट मेसेज 

मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती खराब असल्यानं त्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे. ते काही लंडनला गेलेले नाहीत, असं टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आहेत. पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभालाही ते उपस्थित राहिले नाहीत. सुरुवातीला ते या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. पण ते ऑनलाइनही हजर राहीले नाही. त्यातच आता संजय शिरसाट यांनी त्यांच्या तब्येतीबाबत मोठं विधान केलं. त्यामुळं चर्चांना ऊत आला आहे.

 

 

 

 

 

Tags

follow us