Download App

राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्यासाठी संजय राऊत हाजीर; संजय शिरसाट यांची बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat On Sanjay Raut : भाजपचा (BJP) पराभव करून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली. इंडिया (INDIA) या विरोधकांच्या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. आता तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबैठकी संदर्भात बोलतांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, पाटण्यात आणि बेंगळूरमध्ये आमची सरकारं होती. त्या बैठका आम्ही यशस्वी केल्या. मात्र, महाराष्ट्रात आमची सत्ता नाही, त्यामुळं ही बैठक आमच्यासाठी एक आव्हान आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी राऊतांवर पलटवार केला. (Sanjay Shirsat On Sanjay Raut and INDIA meeting)

आज माध्यमांशी बोलतांना संजय शिरसाट संवाद साधला. त्यावेळी त्यांना इंडियाच्या बैठकीसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले,
जेवणावळीचं कुठं आव्हान असतं का? संजय राऊत हे होस्ट आहेत. ३१ तारखेला त्यांची बैठक होणार आहे. आणि आता ते ठरवणार की, राहुल गांधींच्या राईटला कोण उभे राहणार आणि लेफ्टला कोण उभा राहणार? हे शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं होतं का ? आता हे दिवस आलेत त्यांचे. राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. हेच का सोन्याचे दिवस? ही हुजरेगिरी आहे आणि हुजरेगिरी करायला तिकडे संजय राऊत सारखे चमचे तिथं हजीर आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बांग्लादेशचा कर्णधार ठरला! शाकिब अल हसनच्या खांद्यावर धुरा; विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करणार 

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी वॉर रुम सुरू असतानाच अजित पवार यांनी नव्यानं मॉनिटरिंग कक्ष सुरू केल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारावरून कोल्डवार सुरू असल्याचं बोलल्या जातं आहे. यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कसला कोल्ड वॉर चालू आहे? दोन्ही गरम माणसं आहेत तर कोल्ड वॉर कसं होईल, हॉट वॉर होऊ शकतं. वॉर रूमच्या बैठकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे घेतल्या. सीएम यांच्या रुमचा वापर जर उपमुख्यमंत्र्यानी केला असेल तर गैर काय? सगळं माझं, माझ्याशिवाय काहीच झालं नाही पाहिजे, असं नसतं. आपण सर्वजण मिळून काम करू, हे एकनाथ शिंदे यांचे तत्त्व आहे, असं शिरसाट म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार बोलतांना ते म्हणाले, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे कुणी सांगितलं नव्हतं. ह्या तुमच्या बातम्या आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री सांगतील.

Tags

follow us