Download App

‘म्हणून…जयंत पाटलांना जबाबदारी दिली’, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Shirsat On Jayat Patil : विधानसभा निवडणुकीची विशेष जबाबदारी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जयंत पाटील इतर ठिकाणी जाऊ नयेत म्हणून त्यांना जबाबदारी दिली, असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केलाय. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जबाबदारी का दिली? यामागील इतिहास शरद पवार (Sharad Pawar) यांना चांगलाच माहित असल्याचं संजय शिरसाट पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले आहेत. जयंत पाटील आता हलू नयेत, ते गोड बोलून काय करतील याचा नेम नाही, म्हणून बोलले असतील.

संजय शिरसाट म्हणाले की, जयंत पाटील यांची जी काही घुसमट होत होती, रोहित पवार यांच्यासारखे मोठे नेते उदयास आल्यानंतर जयंत पाटील यांना जो काही दाबण्याचा प्रयत्न केला होता. ती चूक त्यांच्या लक्षात आल्याने ही जबाबदारी टाकली असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत. रोहित पवारांना सांगितलं की, ‘च्विंगम घे आणि तोंडातच चघळत बस’ असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

Sanjay Shirsat : लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल; शिरसाटांनी करून दिली आठवण

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 288 पैकी 200 जागांवर एकमत झालंय. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी-सपाने कोणत्या जागा मागितल्या, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील जागावाटपाचा निर्णय घेतील. यावरून आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. संजय शिरसाट यांनी यावरून आता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

संजय शिरसाट पत्रकार परिषदेत म्हणाले की, काल महायुतीचे रिपोर्ट कार्ड महाराष्ट्राला दिले आहे. 5 वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देणं राजकीय पक्षांचे काम आहे. मात्र, यापूर्वी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये टोमणे मारणे, विरोधात बोलणे परंतु सत्ता असताना त्यांनी काय केलं? हे सांगितलेलं नाही. महायुतीला बदनाम केले जातंय. पत्रकार परिषदेत आरक्षणाचा मुद्दा का मांडत नाही? आरक्षणासंदर्भात बोललं तर विरोधात जातील, यामुळे बोलत नाही. हे लोक जबाबदारी ढकलण्याचं काम करत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय.

मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली; चाकणकरांच्या पाठीशी अजितदादा खंबीर उभे…

महाविकास आघाडी जागा ठरल्याचं सांगत आहे. परंतु आकडे बघितले, तर सर्वांचा आकडा १५४ आहे. मग कशासाठी बोलता
, असा सवाल देखील शिरसाट यांनी केलाय. पवार २०० तर काँग्रेस नेते २२० जागांवर बोलणं झाल्याचं सांगत आहेत. यांचा ताळमेळ नाही. काँग्रेस, ठाकरे, राष्ट्रवादीने घटना बदलणार असा नरेटिव्ह सेट केला होता म्हणून लोकसभेला परिणाम झाला. मोदी सत्तेवर आले तर मुस्लीमांना पाकिस्तानला पाठवतील, याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर झाल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

 

follow us