Download App

Sanjay Shirsat : लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल; शिरसाटांनी करून दिली आठवण

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपच्या निवडणुकांच्या तयारीबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, येणारी लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तारही करावा लागेल. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराची आठवण करून दिली आहे.

मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

…पण मंत्रिमंडळ विस्तारही करावा लागेल

येणारी लोकसभा ही भाजप पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहेम आणि त्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने कार्यक्रमाला लागलेला आहे.आणि म्हणून सर्व आमदारांना लोकसभेची तयारीला लागा अश्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही. परंतु लोकसभा हे टार्गेट ठेवा असं सांगण्यात आलं असावं. मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. विस्तार करावा लागेल पण याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. असं यावेळी संजय शिरसाट म्हणाले.

CPCB Bharti 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ७३ पदांसाठी भरती जाहीर, पगार 1 लाख रुपये; झटपट करा अर्ज

त्याचबरोबर त्यांना यावेळी प्रश्न विचारला असता ते इतर मुद्द्यांवरही बोलले, ते म्हणाले धनगर आरक्षणबाबत हे सरकार सकारात्मक आहे. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल. सर्व समाजाला न्याय द्यायचा ही सरकारची भूमिका आहे. तसेच त्यांनी वारंवार अजित पवारांवर टीका करणाऱ्या भाजपच्या गोपीचंद पडळकरांना सल्ला देखील दिला. ते म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार असतं तेव्हा कोणत्याही नेत्याने एकमेकांवरती टीका करू नये

संजय राऊतांचा फक्त पेट्रोल ओतण हा धंदा

यावेळी त्यांनी संजय राऊतांवर टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं ते म्हणाले की, संजय राऊत हे नेमकं काय, कधी बोलतील? याचा नेम नाही. त्यांचा फक्त पेट्रोल ओतण हा त्यांचा धंदा आहे. आग कशी लावायची हे संजय राऊतांकडुक शिकायचं. फक्त स्वतःचा पक्ष फोडला आणि राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे अशा लोकांच्या वक्तव्यावर लक्ष देणे गरजेचे नाही.

Tags

follow us