CPCB Bharti 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ७३ पदांसाठी भरती जाहीर, पगार 1 लाख रुपये; झटपट करा अर्ज
CPCB Bharti 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करते. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे आणि त्या माहितीचा प्रचार करणे आणि परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करते. त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज असते. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सल्लागार ‘A’, सल्लागार ‘B’, सल्लागार ‘C’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची भरती अधिसूचना संबंधित विभागाने जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत, एकूण 74 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0
अर्ज ऑनलाइन करावे लागणार असून अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वेतन, वयोमर्यादा याबद्दलची तपशीलवार माहिती ही अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
पदाचे नाव – सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’
पोस्टचे नाव व पदसंख्या-
सल्लागार ‘अ’ – 19
सल्लागार ‘बी’ – 52
सल्लागार ‘सी’ – 3
एकूण पदांची संख्या- 74
शैक्षणिक पात्रता –
प्रत्येक ‘सल्लागार’ पदासाठी पात्रता वेगळी आहे आणि त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत.
सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा…; रोहित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट – http://www.cpcb.nic.in
पगार –
सल्लागार ‘ए’ – 60 हजार रुपये.
सल्लागार ‘बी’ – रु 80 हजार.
सल्लागार ‘सी’ – 1 लाख रुपये
अर्ज कसा करायचा
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. उमेदवारांनी https://cpcb.nic.in/jobs.php या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी, सविस्तर सूचना एकदा वाचा. येथे दिलेल्या पात्रता निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात का ते तपासा. आणि असल्यास अर्ज काळजीपूर्वक भरा आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. भरतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही CPCB च्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/12DF2GjKDFledLCqQiFeihWRnj_OL4xgZ/view