CM Devendra Fadnavis : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे. तसेच बंदुकीसोबत सोशल मीडियावर ज्यांचे फोटो व्हायरल झाले आहे त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलं आहे. विरोधात या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.
मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी आतापर्यंत फरार असल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्च्यात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange), भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) , जितेंद्र आव्हाडसह (Jitendra Awhad) अनेक नेते उपस्थित होते.
या मोर्च्यात बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने साधी मुंगी मारण्याची परवानगी दिली नाही. संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता. पण त्याला क्रूरतेनं मारलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. ही पद्धत चुकीची आहे. मी 80 हजार मतांनी निवडणून आलो मात्र धनु भाऊ तुम्ही 1 लाख 42 हजार मतांनी निवडणून आले 330 बुथांपैकी 230 बुथा ताब्यात असतील तर हेच होणार. तुम्ही बोगस मतांनी जिंकून आले आहे असा आरोप केला.
धनुभाऊ बोगस मतांनी जिंकले अन् पंकजा मुंडे …, मूक मोर्च्यात सुरेश धसांची तुफान फटकेबाजी