14 मतांनी हरले, आता वचपा काढणार? शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर !

Satara Bank Election : -गेल्या वेळेस गृहराज्यमंत्री असलेले शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) कोणती रणनिती आखलीय.

Satara Bank Election

Satara Bank Election

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नऊ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठी चुरशीच्या लढती होतायत. या बँकेत दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण दोन्ही मंत्री हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक मंत्री आहेत भाजपचे जयकुमार गोरे आणि दुसरे मंत्री आहेत शिवसेनेचे शंभूराज देसाई. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंसमोर त्यांचे सख्ये भाऊ शेखर गोरे यांचे आव्हान आहे. तर मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर पारंपरिक विरोधक भाजपचे भाजपचे नेते सत्यजित पाटणकरांचे (Satyajeet Patankar)
कडवे आव्हान आहे. त्यामुळे पाटण सोसायटी मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेत आहे. गेल्या वेळेस गृहराज्यमंत्री असलेले शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) कोणती रणनिती आखलीय. शंभूराज देसाईंना आणखी कुणाची ताकद मिळतेय. सत्यजित पाटणकर मागील निवडणुकीप्रमाणे चमत्कार करणार का ? हे पाहुया…

सातारा जिल्हा बँकेत 21 संचालक आहेत. या बँकेच्या नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. बारा जागांसाठी निवडणूक होत आहे. सोसायटी मतदारसंघातील 11 जागा महायुतीतील पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यात पाटण सोसायटीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई विरोधात भाजपचे सत्यजित पाटणकर ही पारंपरिक लढत पुन्हा गाजणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या आखाड्यात उतरले आहेत.


लावणी कलावंताची प्रेरणादायी कहाणी, श्रद्धा कपूर साकारणार दिग्गज कलाकार ईठा बाई, ‘ईठा’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित!

शंभूराज देसाईंचा धक्कादायक पराभव
बँकेच्या मागील निवडणुकीत गृहराज्यमंत्री असताना शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला होता. सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव केला होता. शंभूराज देसाई यांना 44 मते, तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली होती. तब्बल 14 मतांनी पाटणकर विजयी झाले होते. सहकारावर वर्चस्व असणाऱ्या शंभूराज देसाईंसाठी हा मोठा धक्का होता.


ब्रेकिंग-1 नोव्हेंबरला दिल्ली जाम होणार? राहुल गांधींची आंदोलनाची घोषणा!

शंभूराज देसाईंनी पडद्यामागील हालचाली वाढविल्या
पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पडद्यामागील हालचाली वाढविल्या आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी पहिल्या दिवसांपासूनच जोरदार मोर्चेबांधणी केलीय. तसेच सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये बारकाईने लक्ष घालून सोसायट्या आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे दगाफटका नको म्हणून शंभूराज देसाईंनी सोसायटी मतदारसंघातून ठराव झालेले मतदार अज्ञातस्थळी पाठविल्याचा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पाटण सोसायटी मतदारसंघात 104 मतदार आहेत.

मकरंदआबा पाटील, पृथ्वीराज चव्हाण यंदा मदतीला
या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी दोन जमेच्या बाजू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंदआबा पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देसाई यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची मते आपल्या बाजूला वळविण्यात देसाई हे यशस्वी ठरू शकतात. पण मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले या दोघांची ताकद पाठीशी असलेले सत्यजित पाटणकर हेही कच्चे खेळाडू नाहीत. ही मागील बँक निवडणुकीत दिसून आलेले आहे. पण यंदा काहीही करून पाटणकरांचा पराभव करायचा आहे, असा निर्धार देसाईंचा आहे. पण कोण-कोणावर भारी पडणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल हे नक्की.

Exit mobile version