सातारा : छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Vs Shamhuraje ) हे आपल्या बिंधास्त शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे फॅन आहेत. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल असू दे किंवा त्यांची बोलण्याच पद्धत असू दे, या त्यांच्या स्टाईलचे अगदी सामान्य कार्यकर्ते ते मोठे नेते देखील चाहते आहेत. पण त्यांच्या या कार्यकर्त्यांचा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घराजवळ असलेल्या बिल्डींगवर उदयनराजे यांच्या समर्थकांना उदयनराजे यांचे चित्र रेखाटायचे होते. मात्र याला शंभूराजे देसाई यांनी पोलिसांच्या मार्फत विरोध केला आहे. यावरुन शंभूराजे देसाई यांचे कार्यकर्ते व उदयनराजे यांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला आहे. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे-फडणवीसांचा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
माझ्यामध्ये व उदयनराजे यांच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. तसेच सातारा शहरात अथवा सातारा जिल्ह्यात कोणतेही गैरकृत्य सहन केले जाणार आहे. जे कोणी अशाप्रकारे गैरकृत्य करतील त्यांच्यावर कडक कायद्याद्वारे कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात देसाईंनी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना दम दिला आहे.
दरम्यान यानंतर उदयनराजे यांचे समर्थक व शंभूराजे यांच्यामध्ये बैठक पार पडली. याबैठकीतून शंभूराजे दोनत मिनिटांत बाहेर पडले. यानंतर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांना विचारले असता बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; सर्वच क्षेत्रासाठी भरीव निधी
पण यावादानंतर सातारा शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. याआधी अनेकवेळा उदयनराजे व त्यांचे बंधू शिवेंद्रराजे यांच्यामधील वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण यावेळेस मात्र शंभूराजे व उदयनराजे यांच्यात वाद झाल्याचे पहायला मिळाले आहे. यावरुन शिवेंद्रराजे यांनी साठी बुद्धी नाठी म्हणत उदयनराजेंना खोचक टोला लगावला आहे.