“त्या फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; नांदेडच्या शेतकरी मृत्यू प्रकरणी सतेज पाटील आक्रमक

Satej Patil नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Satej Patil on Nanded Farmer's Death at Finance Company

Satej Patil on Nanded Farmer's Death at Finance Company

Satej Patil on Nanded Farmer’s Death at Finance Company: नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असेल, तर संबंधित कंपन्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कर्जवसुलीसाठी छळ? नांदेडच्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

मायक्रो फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी कर्जवसुलीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नेमकं काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करावी. सेबी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्याकडेही अशा मायक्रो फायनान्स तक्रार केली पाहिजे, असं ते म्हणाले.

‘काँग्रेसचे 75, मविआचे 160 आमदार निवडून येणार होते, ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने दिला होता अहवाल’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

सरकारची भूमिका खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताची असेल, तर या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं. सरकार एकीकडे बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असं सांगतं; मग तरीही शेतकऱ्यांना त्रास का दिला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा घटना घडत असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. बँका, फायनान्स कंपन्या सरकारचं ऐकत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

झाडांच्या तोडीवरूनही सरकारला घेरलं

दरम्यान, रायगडच्या कर्जत येथील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरूनही सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली. एका बाजूला एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे पाऊस कमी पडत असल्याचं सांगितलं जातं, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाशी संबंधित नियम धाब्यावर बसवून झाडांची तोडली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणं नव्हे, तर माणूस घडवणं असावा, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

शेतकऱ्यांना दुष्काळ आणि पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागत असताना पर्यावरणाचं नुकसान करणारे निर्णय का घेतले जात आहेत, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, सरसकट कर्जमाफी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली होणाऱ्या कथित त्रासाला आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version