Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. आता सतेज पाटील (Satej Patil) यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
महायुतीच्या मंत्र्यांना वाढीव काम, तगड्या प्रचारासाठी समिती गठीत
आज सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संजय मंडलिक शाहू महाराजांवरील टीका स्वत:च्या स्वार्थासाठी करत आहेत. त्यांना पराभव दिसायला लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली. आपल्यावर एक लाखाचं लीड पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत. शाहू महाराज यांचा अपमान कोल्हापूरची जनता सहन करणार नाही. या वक्तव्याचे प्रायश्चित कोल्हापूरची जनता त्यांना देईल. मात्र, त्याआधी त्यांनी माफी मागावी, असं सतेज पाटील म्हणाले
ते म्हणाले, संजय मंडलिक यांनी ज्या प्रकारे वैयक्तिक स्वार्थासाठी छत्रपती घराण्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील जनता चोख प्रत्युत्तर देईल. याचे पडसाद राज्यात देखील उमटतील. मंडलिकांनी कुस्ती करावी, पण वैयक्तिक टीका टीप्पणी करणार नाही, असं जाहीरपणे सांगून दुसरीकडे वैयक्तिकरित्या हल्लाबोल करत आहेत. त्यामुळं त्यांचे सल्लागार कोण आहेत, याचा शोध त्यांच्या नेत्यांनी घ्यावा.
कोल्हापुरात वृत्तपत्रांशी संवाद साधताना महायुतीच्या दोन नेत्यांनी शाहू महाराजांवर आम्ही टीका करणार नाही, असे सांगितले. शाहू महाराज आमची अस्मिता आहे, असं मोठ्या अभिमानाने सांगतात. मग मंडलिकांना अशी विधान करायला कोण लावत आहे, असा सवालही पाटील यांनी केला.
सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट; पूजाला हाताशी धरुन मला..,
मंडलिकांनी ज्या पद्धतीने विधान केलं आहे, हे कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही. कोल्हापूरची जनता हे कदापि सहन करणार नाही. योग्य ते उत्तर येथील जनता मंडलिकांना देईल, याची आम्हाला खात्री आहे. शाहूप्रेमी लोक नक्कीच याचा निषेध करतील, असं पाटील म्हणाले.
संजय मंडलिक काय म्हणाले होते?
संजय मंडलिक यांचा एका प्रचारसभेत बोलतांना तोल सुटला. मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुध्दा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचं मंडलिक म्हणाले.
मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी असा सवालही संजय मंडलिक यांनी केला.