मराठवाडा पदवीधरांसाठी नवं धोरण काय? सतीश चव्हाणांनी सांगितला ‘मास्टरप्लॅन’

Satish Chavan Graduate Constituency: पदवीधरांचे स्थलांतर रोखण्यासाठी दीर्घकालीन शैक्षणिक धोरण व स्किल बेस्ड एज्युकेशनचा मास्टरप्लॅन सांगितला.

Satish Chavan Marathwada Graduate Constituency

Satish Chavan Marathwada Graduate Constituency

Satish Chavan Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेग आला असून, यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लेट्सअप मराठी’ने सतीश चव्हाण यांच्याशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी पदवीधरांसाठीच्या आपल्या आगामी धोरणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

‘क्रांतिवीर’ पडद्यावरचे, देशभक्ती रक्तातली, नाना पाटेकरांच्या धाडसी देशभक्तीचा पराक्रम

‘दादांचा शब्द माझ्यासाठी आदेश होता’

विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक न लढता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक का लढण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न विचारला असता सतीश चव्हाण यांनी आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा दिला.

‘मी विद्यार्थी चळवळीत काम केलं. वेगवेगळ्या समाजसेवी संघटनांमध्येही काम केलं. शरद पवारांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या विचारांच्या मंडळींसोबतही काम केलं. मात्र, सक्रिय राजकारणात येऊन निवडणूक लढवावी, असा विचार माझ्या मनातही नव्हता,’ असं चव्हाण यांनी सांगितलं.

एमपीएससी आंदोलनाला हायकोर्टाचा दणका; विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनाबाबात थेट आदेश

‘2007 मध्ये अजित पवारांचा (Ajit Pawar) मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, तुला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे. दादांचा तो शब्द माझ्यासाठी आदेशच होता. त्यांनी मला उमेदवारी दिली आणि म्हणाले, सतीश मला तू निवडणूक जिंकलेला पाहायचंय. त्यानंतर मीही निवडणूक जिंकायचीच, असं ठरवलं. मराठवाड्यातील बहुजन मतदारांनी मला साथ दिली आणि मी निवडून आलो’, अशी आठवण चव्हाण यांनी सांगितली.

‘दादांचा विश्वास माझ्या पाठीशी’

अजित पवार यांच्यामुळेच राजकारणात प्रवेश झाल्याचं सांगताना चव्हाण म्हणाले की, ‘माझा राजकारणात प्रवेश अजित दादांमुळेच झाला. पण आज अजित दादा आपल्यात नाहीत. दादा नसताना ही माझी पहिलीच निवडणूक आहे. मात्र, दादांचा आशीर्वाद आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास माझ्या पाठीशी आहे. त्याच बळावर मी निवडून येईन, असा मला विश्वास आहे.’

Gulabrao Patil : पाणीपुरवठा प्रलंबित योजना नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

‘शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात लढण्याचं दुःख’

शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते असूनही आता त्यांच्याच गटाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली आहे, याबाबत काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. तर यावर चव्हाण म्हणाले, ‘याबद्दल मनात खेद आहे. त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे नव्हता. पण हरकत नाही, ही लोकशाही आहे. गेल्या 18 वर्षांत मी मराठवाड्यातील पदवीधर युवकांसाठी काम केलं आहे. या कामाच्या बळावर मी निश्चित निवडून येईन, असा मला विश्वास आहे.’

पदवीधरांचं स्थलांतर रोखण्यासाठी काय करणार?

मराठवाड्यातील पदवीधरांना नोकरीसाठी पुणे, मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतर करावं लागतं. ही परिस्थिती बदलण्याला आपलं प्राधान्य असल्याचं सतीश चव्हाण यांनी सांगितलं.

मराठवाड्यात दुष्काळाचा दुहेरी फटका; वाचा, कुठं किती दिवसांचा चारा अन् कुठं किती दिवसांचा पाणीसाठा?

‘मराठवाड्यातील विद्यार्थी इथेच शिकला पाहिजे, पदवीधर झाला पाहिजे आणि इथेच नोकरीला लागला पाहिजे, हे माझं धोरण आहे. मात्र, दुर्दैवाने सरकारच्या धोरणांमध्ये सातत्य दिसत नाही. यासाठी दीर्घकालीन शैक्षणिक धोरण आखलं पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘मुलांना शाळेपासूनच स्किल बेस्ड एज्युकेशन मिळालं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर त्यांच्याकडे आवश्यक कौशल्यं असतील आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मराठवाड्यातच शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं, हा माझ्या पुढील कामाचा महत्त्वाचा भाग असेल,’ असंही सतीश चव्हाण यांनी सांगितलं.

Exit mobile version