Satish Chavan Will Join Ajit Pawar NCP : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे. कारण, आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाला गळती लागली आहे. यातच आता शरद पवार गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पवारांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांचा सुरुंग; पिंपरीतील गव्हाणे-लांडेंची लवकरच घरवापसी
विधानसभा निवडणुकीच्या आधी आमदार चव्हाण शरद पवार गटात आले होते. त्यावेळी चव्हाण यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, निवडणुकीनंतर राजकारण पूर्ण बदललं आहे. महायुती सोडून गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. यातच चव्हाण यांचाही समावेश आहे. परत येत आहेत म्हटल्यानंर राष्ट्रवादीनेही त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. आमदार चव्हाण उद्याच अजित पवार गटात प्रवेश करतील अशी माहिती मिळाली आहे.
सतीश चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. सहा वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आली होती. परंतु, आता चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या ध्यये धोरणांवर विश्वास ठेऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात येत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत. माजी आमदार विलास लांडे या निवडणुकीत अजित पवार गटासाठी काम करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच त्यांचे नातलग अजित गव्हाणे आणि अन्य वीस माजी नगरसेवक लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले..