पवारांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांचा सुरुंग; पिंपरीतील गव्हाणे-लांडेंची लवकरच घरवापसी
Pune News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे. कारण, आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाला गळती लागली आहे. यातच आता शरद पवार गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत. माजी आमदार विलास लांडे या निवडणुकीत अजित पवार गटासाठी काम करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच त्यांचे नातलग अजित गव्हाणे आणि अन्य वीस माजी नगरसेवक लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अजितदादांनी 2009 सालचा वचपा काढला का? विलास लांडेंनी केली भुजबळांच्या नाराजीवर मोठा खुलासा
माजी आमदार विलास लांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीत तुम्ही घड्याळाचा प्रचार करणार आहात. मात्र तुमचे नातेवाईक अजित गव्हाणे विधानसभेत शरद पवार गटात गेले होते. तुमच्या मार्गदर्शनानुसारच ते तिकडं गेले होते असे सांगण्यात येते. आता त्यांच्याबरोबर वीस माजी नगरसेवक पुन्हा अजित पवार गटात येणार का? असे विचारले असता लांडे म्हणाले, अजित गव्हाणे यांनी ज्यावेळी तो निर्णय घेतला. त्यावेळी त्यांची शरद पवार आणि अजित पवार दोघांबरोबरही बैठक झाली होती. शरद पवार साहेबांच्या बैठकीवेळी मी नव्हतो.
दोन्हीही नेते आपलेच आहेत. तेव्हा विश्वासास पात्र राहू असे करा असे मी त्यावेळी सांगितले होते. कारण बदनामी नेहमी माझ्याच वाट्याला येत असते. पण मला असं वाटतं की आम्हाला शहरात ताकद देण्याचं काम अजित पवार यांनी केलं. शरद पवार आमच्यासाठी श्रद्धास्थानी आहेतच. पण या शहरासाठी काम करणारं कुणी असेल तर ते अजित पवार आहेत.
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून..विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
आता त्यांनी अजितदादांना साथ द्यावी
अजित पवार आणि अजित गव्हाणे यांचा काही संवाद झाला आहे का या प्रश्नावर लांडे म्हणाले, हो मला अजित गव्हाणेंनी सांगितलं की मला अजितदादांचा फोन आला होता. आले तर पुन्हा सर्वांना एकत्र घ्या. ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आहे त्यांना परत ताकद द्या. त्यांना वाऱ्यावर सोडू नका असं मी अजित गव्हाणेंना सांगितलं आहे. वीस नगरसेवकांसह अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबत अजून माझी आणि अजित गव्हाणे यांची काही चर्चा झालेली नाही. पण माझ्याशी चर्चा करून त्यांनी अजित पवार गटात जावं असं मला वाटतं. या शहराची ओळख अजितदादांमुळं झाली आहे. त्यांनीच आम्हाला ताकद दिली हे आम्ही विसरू शकत नाही.