Download App

Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबेंची विजयाकडे वाटचाल, शुभांगी पाटलांपेक्षा दुप्पट मते

  • Written By: Last Updated:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे 14693 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना दुसऱ्या फेरीअखेरीस एकूण 31009 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पहिल्या पसंतीची 16316 एवढी मते मिळाली आहेत. तसेच या मतदारसंघात मते बाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या फेरी अखेरीस 5445 मते बाद झाली आहेत. त्यामुळे आता विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. परिणामी ही मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.

दुसरी फेरी अपडेट

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23

– एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
– वैध मते – 50555
– अवैध मते – 5445

सत्यजित सुधीर तांबे : 31009
शुभांगी भास्कर पाटील : 16316
रतन कचरु बनसोडे : 1157
सुरेश भिमराव पवार : 360
अनिल शांताराम तेजा : 46
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
अविनाश महादू माळी : 623
इरफान मो इसहाक : 28
ईश्वर उखा पाटील : 89
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
ॲड. जुबेर नासिर शेख : 103
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
नितीन नारायण सरोदे : 129
पोपट सिताराम बनकर : 37
सुभाष निवृत्ती चिंधे : 83
संजय एकनाथ माळी : 76

एकूण : 50,555

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष करणारे लावलेले बॅनर्स उतरवावे लागतील, असा इशारा शुभांगी पाटील यांनी दिला. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tags

follow us