अकोले : काँग्रेस ( Congress ) पक्षात आता परत नको, झाला अन्याय आता ठीक आहे, पक्षा पेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगार साठी कामं करू, असे वक्तव्य नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी करत काँग्रेस पक्षामध्ये परत जाण्याचा मार्गाला पूर्ण विराम दिला आहे. यावेळी ते कळस बु. येथे त्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते.
यावेळी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाई चे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे, वीज कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम वाकचौरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे आदी उपस्थित होते.
यावेळी कॉग्रेसचे जेष्ठ नेते सोन्याबापु गुरूजी वाकचौरे यांनी राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. सुधीर तांबे व आ.सत्यजित तांबे यांचे निलंबन मागे घेऊन पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली असता आमदार तांबे यांनी आता कॉग्रेस नको मी अपक्षच ठिक आहे, असे विधान केले. लोकांनी मला निवडून दिले आहे. स्टेजवर भाजप, राष्ट्रवादी, रिपाई चे नेते असून आता सामाजिक कार्य करण्याचे संकेत दिले. जिल्हा परिषद मध्ये दहा वर्ष माझ्या वर कैलासराव वाकचौरे यांनी अन्याय केला असून अध्यक्षपदाची संधी हुकवली तसेच दहा वर्ष आम्हांला निधी बाबद कळूनच दिले नाही, अशी मिश्किल टिप्पणी देखील केली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कळसेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थांनी ढोल ताशाच्या वाद्यांनी तसेच हातानी तयार केलेले सुंदर फुले देऊन स्वागत केले. कळसेश्वर मंदिर व जिल्हा परिषद शाळेचे कौतुक यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास उत्तर देताना आमदार तांबे यांनी अनेक आठवणींना उजाळा देत बेरोजगारी आणि विविध विषयांवर विधानपरिषदेत आवाज उठविण्यार असल्याचे सांगितले.
(Devendra Fadnavis मनसोक्त गप्पात हरवले, ताज हॉटेलात रंगली कष्टकऱ्यांसोबत मैफील)
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच राजेंद्र गवांदे यांनी तर सुत्रसंचालन सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी केले तर आभार सागर वाकचौरे यांनी मानले. यावेळी गटशिक्षण अधिकारी पदी जालिंदर खताळ यांची निवड झाले बद्दल जिल्हा परिषद शाळेचा स्वरित बिबवे या विद्यार्थांनी विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळलेले मॉडेलचे विशेष कौतुक केले व विशेष सत्कार करण्यात आली. हा विशेष कार्यक्रम यशश्वी करण्यास सागर वाकचौरे, ज्ञानदेव निसाळ, कळसेश्वर विद्यालय मुख्यध्यापक सुनीता शेलार, जिप प्राथमिक शाळा मुख्यध्यापक संगीता शेलार यांनी प्रयत्न केले,