Ram Shinde Baramati Visit Action Against Police Officers : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) हे 15 आणि 16 मार्च रोजी बारामती (Baramati) दौऱ्यावर होते. यावेळी गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटी झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा (Action Against Police) समावेश असल्याची माहिती मिळतेय.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार चौकशी करण्यात येऊन प्राप्त अहवालाचे अवलोकन केले. यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती दिनांक 15-16 मार्च, 2025 रोजीच्या बारामती दौऱ्यावर होते. त्यादरम्यान सुरक्षा आणि राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
पहलगाम हल्ल्यानंतर पुढे काय? सीसीएस बैठकीत चर्चा, शाह-डोभाल देखील उपस्थित
1) प्रवीण बाळासाहेब मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 2) रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण 3) वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या कार्यालयास प्राप्त झाला. यानुसार कसूर केलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम
यांच्यासोबत श्रीमती सुवर्णा गायकवाड, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे 2) शामराव यशवंत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 3) रोहित दिलीप वायकर, पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 4) सारिका दादासाहेब बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 5) वसंत सखाराम वाघोले, सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांच्याकडून कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झालंय. त्यामुळे पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडून त्यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.