माजलगावमध्ये दर 3 महिन्याला बैठक घेणार, असं जर पंकजा मुंडे (Beed) म्हणत असतील तर मग पाच वर्षं पालकमंत्री होता, तेव्हा किती वेळा माजलगावमध्ये आलात? असा थेट सवार उपस्थित करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश सोळंके यांनी भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.
माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपा स्वबळावर लढत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेदरम्यान दर तीन महिन्याला माजलगावच्या नगरपरिषदेची बैठक घेणार, असं म्हटले होतं. यावर रात्री प्रचार सभेदरम्यान बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी भाष्य केलं आहे.
बीड जिल्हा म्हणजे युद्धभूमी, कुणी येतो अन् जातीवर जातो, जयदत्त क्षीरसागरांनी व्यक्त केली खंत
दर तीन महिन्याला माजलगावमध्ये बैठक घेणार म्हणता, ताईसाहेब तुम्ही पाच वर्षं पालकमंत्री होता, किती वेळा माजलगावला आलात. पाच वर्षांत एखादी बैठक घेतली का? माजलगावसाठी आणि आता कुठल्या तोंडाने सांगताय असंही सोळंके म्हणाले आहेत.
त्याचबरोबर मागच्या काळामध्ये तीन महिन्याला तुम्ही परळीला गेला असता, तर परत जिंकला असतात असा जोरदार टोला लगावत, तुम्ही तिथे गेला नाहीत. कशाकरिता खोटी आश्वासनं देता, असंही प्रकाश सोळंके यावेळी म्हणाले आहेत.
