Download App

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

  • Written By: Last Updated:

Shahaji Bapu Patil :  शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या एक डायलॉग खूप फेमस झाला होता. त्यामुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यानंतरदेखील त्यांची वक्तव्य कायम चर्चेत राहिली आहेत. आता त्यांच्या एका वक्तव्यांने खळबळ उडाली आहे.

अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा प्लॅन होता की, शिवसेनेच्या आमदारांची संख्या 10 ते 15 च्यावर जाऊ द्यायची नाही. तसेच आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी अजित पवार व बाळासाहेब थोरातांनी केली होती, असा धक्कादायक दावा शहाजी बापूंनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत माझे तिकीट कापण्याची तयारी देखील पवारांनी केली होती, असे ते म्हणाले आहेत.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

तसेच शरद पवारांना मी खूप जवळून ओळखतो. ते 45 वर्षे माझे पालक होते. शरद पवार यांना कुणाला राजकारणातून संपवायचे असल्यास ते त्यांना जवळ घेतात व राजकारणातून संपवून टाकतात, असे बापू म्हणाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्ष व इतर अनेक छोटे-मोठे पक्ष संपवून टाकले, असे ते म्हणाले आहेत.

शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील होते. शहाजी बापूंच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ होत असून यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी बापूंनी याबाबत माहिती दिली आहे.

Tags

follow us