Shambhuraj Desai on Anil Parab during Monsoon Sassion in Legislature : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक अनेक मुद्द्यांवरून एकमेकांना भिडत आहेत. यामध्ये आता विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. या मुद्द्यावरून हा वादंग झाला. या वादानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. शब्द रेकॉर्डवरून काढण्यात आले.
मोठी बातमी : गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा होणार; आशिष शेलार यांची घोषणा
नेमकं काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई?
विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. यावेळी परबांना उत्तर देताना देसाईंची जीभ घसरली. ते म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं तुम्ही दिले नाही. तुमचं मराठी माणसांविषयी प्रेम किती खोटं आहे. हे तुम्ही स्विकारा. तू गद्दार कुणाला म्हणतो. बाहेर ये तुला दाखवतो. तू कुणाचा बूट चाटत होता.असं म्हणत देसाई यांची सभागृहात जीभ घसरल्याचं पाहायला मिळाली.
’75 वर्ष वय झालं… आता मोदींची एक्झिट’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
काय म्हणाले होते अनिल परब?
मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. या मुद्द्यावरून परब आणि देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. असं वक्तव्य अनिल परब यांनी बसून केलं होतं. त्यानंतर परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. या वादानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. शब्द रेकॉर्डवरून काढण्यात आले.