सातारा : आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार हे मनकवडे आहेत का? असा सवाल करुन शिंदे गटाच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्याची चिंता रोहित पवारांनी करावी. शिवसेनेच्या शिंदे गटात कसलाही भूकंप होणार नाही. झालाच तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)भूकंप होईल. त्यातून रोहित पवारांना सावरणं अवघड होईल, असा टोला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना लगावलाय.
आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आज सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले. शंभूराज देसाई म्हणाले की, आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार मनकवडे आहेत काय. त्यांनी आमच्या शिंदे गटाच्या 50 आमदारांची चिंता करु नये. उलट तुमच्या आमदारांत अस्वस्थता आहे, त्याची चिंता पहिल्यांदा करा.
Ravikant Tupkar यांनी तुरुंगातून बाहेर येताच सरकारला दिला इशारा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 18 तास काम करत आहेत. मागील मुख्यमंत्र्यांशी तुलना केली तर फरक स्पष्ट दिसेल. हे दोघे कोणत्याही आमदारांच्या फाईली अडवत नाहीत. नियमात असलेल्या, जनहिताच्या, लोकहिताच्या फाईलना कधीही विलंब करत नाहीत. त्यामुळं पेंडन्सी राहात नाही. जनहिताची कामे सध्या मोठ्याप्रमाणात चालली आहेत.
मागील अडीच वर्षात लोकांची कामं झाली नव्हती, ती आता होत आहेत. हे न बघवल्यामुळं रोहित पवार असं बोलत आहेत. त्यामुळं आमच्या शिंदे, फडणवीस सरकारमध्ये कसलाही भूकंप होणार नाही. झालाच तर महाविकास आघाडीत भूकंप होईल, त्यातून रोहित पवार यांना सावरणंही अवघड होईल, असा खोचक सल्लाही शंभूराज देसाई यांनी दिलाय.