Ravikant Tupkar यांनी तुरुंगातून बाहेर येताच सरकारला दिला इशारा

Ravikant Tupkar यांनी तुरुंगातून बाहेर येताच सरकारला दिला इशारा

अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची अकोला कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका देखील केली.

पोलिसांनी आम्हला नक्षलवाद्यांसारखी वागणूक दिली. आम्ही काय मागतोय कापूस आणि सोयाबीनला दर मागतोय. पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई मागतो. मात्र हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. जेलमध्ये टाकून आम्ही घाबरणार नाही.

Supreme Court Hearing : सत्तासंघर्षावर ठाकरे-शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

जोपर्यंत सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आता एकजूट झाला आहे. मस्तवाल पुढाऱ्यांना शेतकरी आता जागा दाखवेल असा इशारा तुपकरांनी दिला आहे. जे लोक आंदोलनात नव्हते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान पुढची आपली दिशा काय असेल असेही तुपकरांना प्रसारमाध्यमांनी विचारले त्यावेळी ते म्हणाले की, आता बुलढाण्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

पुढचं आंदोलन आर या पारचं असणार आहे. आता मागे हटणार नाही. पुढचं आंदोलन हे सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल असा इशारा तुपकरांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शहीद भगतसिंग आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आदर्श आमच्यासमोर असल्याचं तुपकर म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube