शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

Desai Vs Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत भेट घेत तब्बल सव्वा तास चर्चा केली. या भेटीवरून एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद […]

Shambhuraj Desai Uddhav Thackeray

Shambhuraj Desai Uddhav Thackeray

Desai Vs Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत भेट घेत तब्बल सव्वा तास चर्चा केली. या भेटीवरून एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद पवार यांना काका मला वाचवा असे तर म्हणाले नाही ना, असा मला प्रश्न पडत आहे.

‘सिल्वर ओक’ शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह या चारही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाली आहे. या बैठकीवरून एकनाथ शिंदे गटाच्या नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे यांच्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत खोचक अशी टीका केली आहे.

‘सिल्व्हर ओक’वर ठाकरे-पवारांमध्ये सव्वा तास खलबतं! पण… – Letsupp

शंभूराज देसाई म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर होता. हे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे यांनी सत्तेसाठी रिमोट दुसऱ्याकडे दिला होता. ठाकरे यांच्या आजच्या ‘सिल्व्हर ओक’वरील भेटीने उघड झाले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, आजपर्यंत ‘मातोश्री’चा बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास महाराष्ट्राने पहिला आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा, खलबत असो. ते सर्व सोडवण्यासाठी ‘मातोश्री’वर जात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ते सर्व वारसा गुंढाळून ठेवला असल्याचे दिसून येत आहे. ही भेट पाहिल्यानंतर शिवसैनिकांना किती वेदना झाल्या असतील. उद्धव ठाकरे हे ‘सिल्व्हर ओक’वर काका मला वाचवा असं म्हणायला तर गेले नाही ना? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version