Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राज्यात सध्या बारसू प्रकल्पावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. कोकणातील या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधत आहे. यातच उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी राणेंवर टीका केली आहे. राणे जरी ठाकरेंवर टीका करत असेल तरी मात्र नितेश राणे आणि नारायण राणेंचा राजकीय बाप कोण असेल? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. अशा शब्दात कोळी यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच सध्या विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपकडून राणे कुटुंबियांनी पुढाकार घेतला आहे. दरदिवशी राणे कुटुंबियांकडून विरोधकांसह ठाकरे कुटुंबांवर निशाणा साधला जात असतो. दरम्यान राणे यांच्या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना कोळी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जर कोणी बोलण्याचा अथवा मोर्चा काढण्याचे धाडस करू नये. त्यामुळे नितेश राणेंना बजावून सांगतो बेडकाने हत्तीचा मुका घ्यायला जायचं नाही कारण हत्ती हा पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दात कोळी यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे.
तसेच कोकणातील जनतेचा तुमच्यावर राग आहे. तुम्ही कोकणातील असून बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. बारसू शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका. कारण बारसू शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किंवा दम समजा या भाषेत कोळी यांनी राणेंना इशारा दिला आहे. नितेश राणे आणि नारायण राणेंचा राजकीय बाप कोण असेल? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत.
राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा राणेंवर हल्लाबोल
यामुळे राणे तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू व नितेश राणे, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना अडवण्याचा प्रयत्न केला बारसुतील जनता आणि शिवसैनिक तुम्हाला तुडवून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. संजय राऊत हे रंग बदलत नाहीत तर राणे कुटुंबीय रंग बदलतात त्यांनी मागील वर्षात अनेक रंग जनतेला दाखवले आहेत. अशा शब्दात कोळी यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे.